Saturday, October 16, 2010

ayushyavar bolu kahi?

जगणे म्हणजे काय मित्रहो?
विचार केला आहे कधी?
उत्तर माला सांगू नका,
कारण जगणे समजा आधी.

जगणे म्हणजे मोर पिसारा,
उभ्या गगनात न मावनारा.
जगणे म्हणजे सुसाट वारा,
 स्वचंदपने घोंगावनारा.

जगणे  म्हणजे आयुष्य नव्हे,
तर तो एक क्षण आहे.
या क्षणांच्या घरट्या मधे,
आयुष्याचे एक पिल्लू आहे.

जगणे म्हणजे चालत राहने,
पुढे पुढे आणी निरंतर.
या वाटचाली मधे आपण,
शोधतो जगण्याचे खरे उत्तर.

उत्तर ज्याचे त्याचे असते,
काही लहान कही मोठे असते.
शाळेत ल्या पेपरा सारखे,
यात चूक बरोबर मात्र कधी  नसते.

उत्तर शोधने सोपे नसले तरी,
उत्तर शोधायची जिद्द हवी.
आयुष्य म्हणजे असंख्य प्रश्न,
पण त्या प्रश्नांशी मैत्री हवी.

कही प्रश्न अवघड असतात,
कही केल्या उलगडत नाहीत.
कही सोपे प्रश्न मात्र,
सुटून सुधा सुटत नाहीत.

सुटता सुटता कही प्रश्न,
प्रश्नांचा पाऊस पाडतात.
त्या प्रश्नांच्या सरी आपल्याला,
नकळत अंतर्मुख करून जातात.

प्रश्नांशी हितगुज करता करता,
आयुष्य असेच निघून जाते.
आयुष्याच्या संध्याकाळी,
या प्रश्नान्चिच साथ मिळते.

ती संध्याकाळ गुलाबी हवी,
असे तुम्हाला हवे असेल.
आरशा मधे स्वतःला पहा,
आयुष्य तुम्हाला साद देत असेल...

Translation below...

what is living friends?
have you ever thought?
dont tell me the answer,
first understand what it means.

living is a peacock tail-fan,
which fills the entire sky.
Its like an unrelenting gale,
unstoppable in its path.

living is not the entire life,
its just a moment.
its in the nest of these moments,
that life actually is growing up.

living is like a walk,
constant and always forward,
its in this journey that,
we try to find life's true purpose.

anwsers are your own,
some subjective some objective.
but unlike in school papers,
theres no right or wrong with them.

though finding answers is not easy,
its the passion to find that matters.
although there are too many questions,
you have to be friends with them.

some questions are tough,
almost seem un-resolvable.
some simple questions, somehow,
complicate even simple answers.

some questions unravel and,
themselves start another shower of questions.
those drops of questions,
make our wet soul introspect.

contemplating with these questions,
life completes a cycle,
in the evening of life itself,
its these questions that give us solace.

if evening to be happy,
is your true wish,
get out of your bed, stand in front of the mirror,
life would be beaconing ...